Site icon Udyacha Mharashtra

Kangana Ranaut response अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया: “लोकांचा जीव खूप अनमोल आहे”

Allu Arjun
Allu Arjun

कोणताही सेलेब्रिटी शहरामध्ये कुठेही दिसला तर त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात आणि यातच बऱ्याचदा चाहत्यांना किंवा सेलेब्रिटीला दुखापत होते. अशीच एक घटना हैदराबाद मध्ये घडली आहे.

सध्याच्या सिनेसृष्टीतील महत्त्वाची घटना आणि चर्चा

हैदराबादमध्ये पुष्पा 2: द रुल या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली. ही घटना त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे घडली, ज्यामुळे चाहत्यांच्या मोठ्या जमावाने गर्दी करत गोंधळ घातला. आणि त्यातच अशी घटना घडली. कोणालाच माहिती नव्हते असे पण काही होऊ शकते.

Kangana Ranaut response कंगना राणौतची परखड प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने या घटनेवर भाष्य करत जनतेच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला आहे. ती म्हणाली, “लोकांचा जीव खूप अनमोल आहे. अशा मोठ्या कार्यक्रमांच्या वेळेस योग्य नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आयोजकांवर आणि सेलिब्रिटींवर आहे.” त्याचबरोबर कशी काळजी घेऊ शकता याचेही सांगितले. आणि पुन्हा पुन्हा व्हायला नको यासाठी काळजी घ्यायला हवी असे सांगितले.

कंगनाने सेलिब्रिटींच्या भूमिकेवरही भाष्य केले आणि चाहत्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे सांगितले. तिच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीतही चर्चेला उधाण आले आहे.

काय घडले होते?

पुष्पा 2 च्या प्रीमियरदरम्यान अल्लू अर्जुनच्या आगमनाची कोणतीही पूर्वसूचना नव्हती.

त्याच्या चाहत्यांनी थेटरच्या दिशेने धाव घेत गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

या घटनेत 35 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला.

प्रेक्षक आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी

हैदराबाद पोलिसांनीही या घटनेबद्दल स्पष्ट केले की, थेटर व्यवस्थापन आणि आयोजकांकडून योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. मोठ्या इव्हेंटसाठी अशा प्रकारच्या गोंधळाचा विचार करून नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही घटना केवळ तेलुगू चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रासाठी एक धडा आहे. कंगना राणौतसारख्या सेलिब्रिटींची भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरते, कारण त्यांनी अशा प्रकरणांमध्ये जाहीरपणे जबाबदारीची भावना व्यक्त केली आहे.

अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कलाकार, आयोजक, आणि सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे.

Exit mobile version