Site icon Udyacha Mharashtra

महाराष्ट्र खातेवाटप 2024: देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

महाराष्ट्र खातेवाटप 2024

महाराष्ट्र खातेवाटप 2024

महाराष्ट्र खातेवाटप 2024: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी पाहा.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल आठ दिवसांनी, अखेर खातेवाटप जाहीर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर, १५ डिसेंबरला एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, खातेवाटपाची घोषणा उशिरा झाल्यामुळे विरोधकांनी सातत्याने टीका केली होती. विनाखात्याचे मंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात त्यांनी काम केले. आता खातेवाटप जाहीर झाल्यामुळे, मंत्र्यांना अधिकृतपणे मंत्रालयांचा कार्यभार मिळाला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे खातेवाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गृहखाते स्वतःकडे ठेवले आहे. तसेच, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क यांसह अन्य काही खातेही त्यांनी स्वतःकडे घेतली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आणि राज्य उत्पादन शुल्क यांचा कार्यभार आहे.

खास खातेवाटपाबाबत राज्यभर उत्सुकता
राज्यभरातील नेते आणि जनतेचे लक्ष नितेश राणे, धनंजय मुंडे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर आणि जयकुमार गोरे यांना मिळालेल्या खात्यांकडे लागले होते. खातेवाटपानंतर आता त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटप यादी:

  1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल खाते मिळाले
  2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खाते मिळाले
  3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले
  4. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मिळाले
  5. गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) खाते मिळाले
  6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले
  7. गणेश नाईक – वन खाते मिळाले
  8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण खाते मिळाले
  9. संजय राठोड – मृदा व जलसंधारण खाते मिळाले
  10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते मिळाले
  11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन खाते मिळाले
  12. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा खाते मिळाले
  13. जयकुमार रावल – विपणन, राजशिष्टाचार खाते मिळाले
  14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन खाते मिळाले
  15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, अक्षय ऊर्जा खाते मिळाले
  16. अशोक उईके – आदिवासी विकास खाते मिळाले
  17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण आणि माजी सैनिक कल्याण खाते मिळाले
  18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान खाते मिळाले
  19. दत्तात्रय भरणे – क्रीडा, अल्पसंख्याक विकास व औकाफ खाते मिळाले
  20. अदिती तटकरे – महिला व बालविकास खाते मिळाले
  21. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खाते मिळाले
  22. माणिकराव कोकाटे – कृषी खाते मिळाले
  23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज खाते मिळाले
  24. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन खाते मिळाले
  25. संजय सावकारे – वस्त्रोद्योग खाते मिळाले
  26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय खाते मिळाले
  27. प्रताप सरनाईक – वाहतूक खाते मिळाले
  28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मिठागरे विकास खाते मिळाले
  29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन खाते मिळाले
  30. नितेश राणे – मत्स्य व बंदरे खाते मिळाले
  31. आकाश फुंडकर – कामगार खाते मिळाले
  32. बाबासाहेब पाटील – सहकार खाते मिळाले
  33. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते मिळाले

राज्यमंत्र्यांची यादी:
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ, वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले
35. आशिष जयस्वाल – अर्थ व नियोजन, विधी व न्याय खाते मिळाले
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा खाते मिळाले
37. इंद्रनील नाईक – उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन खाते मिळाले
38. योगेश कदम – गृह (शहर) खाते मिळाले
39. पंकज भोयर – गृहनिर्माण, गृह (ग्रामीण) खाते मिळाले

राज्याच्या नव्या खातेवाटपामुळे आगामी काळात सरकारची कामगिरी कशी राहील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version