Site icon Udyacha Mharashtra

मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा संघर्षाचा बिगुल वाजवला गेला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करत 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे हे उपोषण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जरांगेंनी सरकारला दिला अल्टीमेटम
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “सरकारने 25 जानेवारीपूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. कुठेही कुणबी नोंद सापडली तर त्या व्यक्तीला त्याच्या तालुका ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे.” या मागण्या मान्य न झाल्यास सरकारला पश्चात्ताप करावा लागेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य व्हायलाच हव्या आणि न झाल्यास आम्ही 25 जानेवारी पासून आंदोलनाला सुरूवात करू असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

25 जानेवारीला आंदोलनात मराठा समाजाची ताकद दाखवण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत म्हटले, “25 जानेवारी रोजी राज्यातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपली शक्ती दाखवावी. मराठा समाजाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची गरज आहे.” येत्या 25 तारखेला आंदोलनाला सुरुवात होईल असा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मराठा समाजाचा निर्धार:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आधीही अनेक आंदोलने केली असून यावेळीही सरकारने मागण्या मान्य न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि आताही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण आंदोलनाची तारीख घोषित केली आहे.

मुख्य मुद्दे:

  1. 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होणार.
  2. कुणबी नोंद सापडल्यास तातडीने प्रमाणपत्र देण्याची मागणी.
  3. मराठा समाजाने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावे.


मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी येत्या काही दिवसांत सरकारची भूमिका काय असेल आणि समाजाची पुढील रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version