Site icon Udyacha Mharashtra

Manoj Jarange Patil यांनी उपोषण सोडले: जाणून घ्या कारण

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आज नऊ दिवसाच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्ती केली. पण अजूनही मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष सुरूच आहे!

 

manoj jarange patil

 

मराठा आरक्षणाबद्दलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज  जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्त केली. त्यांची तब्येत खूपच जास्त खालावली होती आणि याच कारणाने उपोषण थांबले. परंतु त्यांनी मराठा समाज बांधवांना खडसावून सांगितले की अजून लढाई संपली नाही आणि ही लढाई ही आंदोलन मराठा आरक्षण मिळेपर्यंत असणार आहे.

Magel tyala solar pump yojana 2024 online registration मागेल त्याला सौर कृषी पंप

नऊ दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील(Manoj Jarange Patil )यांनी मराठा बांधवांच्या आणि कुटुंबीयांच्या विनंतीवरून उपोषण थांबवले आहे. त्यांची तब्येत खूपच जास्त प्रमाणात खालवली असल्याकारणाने त्यांना सलाईन सुद्धा देण्यात आल्या होत्या. याचमुळे त्यांनी पाणी पिऊन तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन थांबवले आहे. पण त्यांनी आपल्या सहकारी यांच्याशी बोलत असतांना  सांगितले की, मराठा समाजासाठीचा हा संघर्ष थांबलेला नाही. हा असाच आरक्षण मिळेपर्यंत सुरूच असणार आहे.

उपोषण थांबवत असताना त्यांनी मराठा समाज बांधवांना येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांच्या प्रचार सभेला न जाण्याची आणि त्यांचा प्रचार न करण्याचे सांगितले आहे. नेत्यांच्या प्रचार सभेवर बहिष्कार टाकण्याचे सांगितले. राजकीय नेते जर आपले प्रश्न सोडवायला तयार नसतील तर आपण सुद्धा त्यांना पाठिंबा देणे बंद करायला हवे. जरांगे पाटील यांनी  सहकाऱ्यांशी बोलताना सांगितले की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन आपले कार्य थांबवायचे नाही. मराठा आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, असे त्यांनी समाज बांधवांना सांगितले.

मनोज जरांगे  पाटील (Manoj Jarange Patil ) यांच्या आंदोलनामुळे अख्खा मराठा समाज एकत्रित झाला आणि आपल्या हक्काची लढाई लढत आहे. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण थांबवतेवेळी सांगितले.

Exit mobile version