5 Yogaposes for Backpain in Marathi :ही 5 योगासने आहेत पाठदुखीसाठी वरदान

 

5 योगासने तुयांच्यासाठी ठरू वरदान (5 Yogaposes for Backpain in Marathi)

 

5 Yogaposes for Backpain in Marathi
5 Yogaposes for Backpain in Marathi

 

 

 

 

आज आपण बघतो की पाठदुखीचे  प्रमाण खूप जास्त वाढले आहे. (5 Yogaposes for Backpain in Marathi : ही 5 योगासने आहेत पाठदुखीसाठी वरदान) काहीजण ऑफिसमध्ये खुर्ची वरती बसून काम करत असतात. त्यांची हालचाल त्या वेळी शून्य असते. म्हणजे फिटनेस च्या दृष्टिकोनात ही हालचाल तुम्हाला अजूनच कमकुवत बनवत जात असते. ज्या प्रमाणे एखादी गाडी जरि नवी असेल आणि त्या गाडीची हालचाल काहीच नसेल तर त्यामुळे ती महागडी गाडी सुद्धा खराब होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे असते. शरीराला व्यायाम हा खूप गरजेचा आहे. व्यायामामुळे शरीर मजबूत बनते. योगामुळे शरीर आणि मन दोन्ही मजबूत बनत जाते. त्या कारणामुळे त्यांना पाठीचा त्रास हा होत असतो.  तसेच खांद्याचा त्रास, तसेच मानेचा त्रास, हे वाढतच जात आहे. तसेच बाकीच्यांच्या बाबतीत  पाठीचा त्रास हा काही कारणास्तव असतो.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ,पाठीचा त्रास का होतो? पाठीचा त्रास होण्याचे दोन कारणे आहेत.  एक पाठीचे स्नायू कमकुवत असणे आणि दुसरं स्नायू ताठ असणे.  ज्यावेळी स्नायू कमकुवत असतात, कमजोर असतात त्यावेळी आपल्याला  पाठ दुखी होते आणि जर स्नायू ताठ असेल म्हणजे टाईट असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला पाठीचा त्रास होतो.  आणि या पाठ दुखीमुळेच  आपल्याला भरपूर गोष्टींना सामोरे जावे लागते. दवाखाना करावा लागतो, औषध घ्यावे लागतात आणि त्याच औषध गोळ्यांचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हेच कारण आहे, ज्यामुळे आपण आज तुम्हाला 5 योगासने सांगणार आहे, ज्यांचा दुष्परिणाम नाही झाला तर फायदाच होणार आहे.

तर चला मग पाहूया ते 5 योगासने जी तुम्हाला पाठदुखीच्या त्रासापासून मुक्त करतील.

 

How to do triangle pose for weight loss; त्रिकोणासन कसे करावे ?

 

  1. वक्रासन : 

    Vakrasan
    Vakrasan

वक्रासन साठी,

आता असंच आपल्याला डाव्या बाजूने करायचं आहे.  पाय सरळ, पाठ सरळ, हळूच डावा पाय फोल्ड करायचाय, डावा पायाचा पंजा उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ, श्वास घ्यायचा आहे. परत श्वास सोडत उजव्या हाताने डावा पाय पकडायचा (गुडघा किंवा मांडी).  त्यानंतर डावा हात आपल्या पाठीच्या सरळ ठेवायचा आहे.  आणि जेवढं शक्य होईल तेवढं पाठीमागे बघण्याचा प्रयत्न करायचा.  मानेला त्रास होणार नाही अश्यारीतीने मान ठेवायची आहे. या आसनाचा आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे. दररोज अभ्यास केल्यामुळे या आसनाचा सराव होईल आणि पाठ दुखीमध्ये आराम मिळेल.

 

 

   2. पश्चिमोत्तानासन :

 

यानंतर दुसरं आसन आहे, ते  म्हणजे पश्चिमोत्तानासन.

 

या आसनात असतांना बघू शकता तुमच्या पायांच्या नसा, पायांचे स्नायू  हे ताणल्या जात आहेत. त्यानंतर पाठीचा भाग सुद्धा यामुळे स्ट्रेच होतो.  ताणल्या जातो आणि याचाच परिणाम तुमची पाठ दुखी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल, गुडघेदुखी असेल, तर गुडघ्यांना हलकसं फोल्ड केलं तरी चालेल. हलकसं  गुडघ्यांना वरती उचलून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्या गुडघ्यांवर ताण येणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही पश्चिमोत्तानासन करू शकता .

पश्चिमोत्तानासन चा फायदा पाठदुखी साठी तर होतोच, याबरोबर या आसनामुळे तुमची पचन शक्ति वाढते आणि जे खाल्ले आहे ते शरीराला लागते. असे विविध फायदे पश्चिमोत्तानासन चे आहेत.

 

 

       3. धनुरासन :

Dhanurasana
Dhanurasana

यानंतर तिसरा आसन धनुरासन. या आसनाला धनुरासन यामुळे म्हणतात की, ज्यावेळी आपण हे आसन करतो त्यावेळी हे एखाद्या धनुष्यासारखं,धनुरा सारखं दिसतं.  आणि त्याच्या या धनुष्यासारख्या आकारामुळे याला धनुरासन हे नाव पडलं.

 

 

वरती उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या पाठीवरती ताण येत आहे.  तुमच्या पोटाचे, छातीचे, पाठीचे, खांद्यांचे स्नायू तणल्या जात आहे. याच कारणामुळे आपली पाठदुखी कमी होते. अश्या रीतीने तुम्ही धनुरासन करून आपल्या पाठीला मजबूत ठेवू शकता.

 

      4. सेतुबंधासन :

यानंतर चौथ आसन आहे सेतुबंध आसन.

या आसनाचा मध्ये एखाद्या पुलाप्रमाणे आपल्या शरीराचा आकार तयार होईल आणि याचमुळे (सेतू म्हणजेच पूल), याला सेतुबंधासन असे म्हणतात. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाच ते दहा श्वास इथे थांबायचं आहे श्वास थांबवायचा नाहीये श्वास कंटिन्यू राहणार आहे त्यानंतर इथे थांबल्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला परत खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला आराम करायचा आहे.

 

     5. पवन मुक्त आसन :

या आसनाचा  फायदा असा होईल की तुमच्या पाठीचा भाग, पाठीचे मसल्स ताणल्या जातील आणि पाठदुखी बरी होण्यास मदत होईल.

 

 

हे पाच योगासने (5 Yogaposes for Backpain in Marathi : ही 5 योगासने आहेत पाठदुखीसाठी वरदान) तुम्हाला पाठदुखी पासून मुक्ती देणार आहेत. त्यामुळे या असनांबरोबर मैत्री करा आणि आपले आरोग्य सुधारा.

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *