आता गावतच राहून करा (Start these top 5 businesses in your village) हे व्यवसाय आणि महिन्याला कमवा लाखों.
बऱ्याच वेळा आपण पैश्यांसाठी गाव सोडतो जिथे आपण आपलं बालपण घळवलं,(Start these top 5 businesses in your village) जिथे आपले आईवडील आहेत, जिथे आपले मित्र आहेत. पण काय जर फक्त पैसाच कमवायचा असेल तर तो तुम्ही गावात राहून सुद्धा कमवू शकता आणि स्वत:चे मालक स्वत: बना. शहरात जाऊन दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा गावात राहून स्वत: मालक बनलेलं कधीही चांगलं. तर चला मग आज मी तुम्हाला असे पाच व्यवसाय कल्पना (Start these top 5 businesses in your village) सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नोकर नाही, मालक बनाल.
त्या सगळ्यांच्या प्रश्नाचे हे उत्तर आहे जे म्हणतात की, गावाकडे राहून पैसा आणि नाव कमावता येईल का ? आणि हो पुन्हा कोणी तुम्हाला जर हा प्रश्न विचारला तर सरळ त्याला हे आर्टिकल पाठवून द्या आणि त्यांना ही कळू द्या गावकडे राहून काय काय आणि कसे करू शकते.
- महाराष्ट्र खातेवाटप 2024: देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी
- गरुड पुराणानुसार महापाप आणि त्यांच्या परिणामांची सखोल माहिती
- पुरुषांसाठी फिटनेस टिप्स | Fitness Tips for Men in Marathi
- मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
- उस्ताद ज़ाकिर हुसैन – तबल्याचा जादूगार
आज आपण जे व्यवसाय बघणार आहोत त्यात काही व्यवसायासाठी स्किलची गरज आहे, तर काहींना तर स्किल ची सुद्धा गरज नाही फक्त तुम्हाला त्यासाठी योग्य वेळ आणि मेहनत करावी लागणार आहे. थांबा .. फक्त हे सुद्धा कधी कधी यश मिळत नाही यासोबतच तुम्हाला गरज आहे ‘ मार्गदर्शनाची ‘ आणि ते सुद्धा योग्य व्यक्तीकडून मिळणे गरजेचे आहे. मला माहिती आहे, मला काय म्हणायचे आहे ते समजले असेलच. तर चला ते पाच व्यवसाय कल्पना जाणून घेऊया. (Start these top 5 businesses in your village)
- सेंद्रिय शेती :
सध्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आणि फळभाज्या यांना खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. आणि हीच मागणी तुम्ही गावाकडे राहून स्वत:च्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली पालेभाज्या आणि फळभाजी तुम्ही मार्केट ला घेऊन जाऊ शकता आणि भरघोस कमाई कमवू शकता. तसेच जर तुम्ही शहरी भागाच्या जवळ असाल तर तुम्ही हाच माल ऑनलाइन पद्धतीने सुद्धा विकू शकता.
- दुग्धव्यवसाय
या व्यवसायामद्धे तुम्ही स्वतः च्या गाई किंवा म्हशी विकत घेऊन दुधाचा व्यवसाय करू शकता. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जवळचा पैसा गुंतवावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्यामधूनच जास्त उत्पन्न कमवू शकता. यामध्ये तुम्ही सुरुवातीला एक गाय किंवा म्हैस घेऊ शकता आणि नंतर हळूहळू गाई आणि म्हशी वाढवू शकता.
या मध्ये फक्त दूधच नाहीतर दुधापासून बणणारे सर्व उत्पादने विकू शकता आणि दुधापेक्षाही जास्त उत्पन्न कमवू शकता.
- कुकुटपालन किंवा मत्स्यपालन
शेतीलाच जोडधंदा म्हणून तुम्ही कुकुटपालन किंवा मत्स्यपालन करू शकता आणि आपल्या कामईमद्धे वृद्धी करू शकता. यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि गुंतवणूक दोन्हीची गरज आहे. कोंबडी विकून किंवा अंडी विकून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. सध्या सर्वच लोक आपल्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेत असतात आणि त्यातच शरीरसाठी प्रोटीन खूप आवश्यक आहे आणि हे आपल्याला जास्त करून मास मासे अंडी मधून जास्त मिळते आणि याच कारणाने यांची बाजारामद्धे जास्त मागणी आहे. त्यामुळे या व्यवसाया मधून तुम्ही जास्त कमाई करू शकता.
- हस्तकला आणि उत्पादने
गावाकडच्या बऱ्याच लोकांनी पारंपरिक हस्तकला जोपासल्या आहेत आणि त्यातूनच ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. असेच काही हस्तकला उत्पादने तुम्ही बनवू शकता ज्याला शहरी भागांमध्ये जास्त मागणी आहे. आणि हो तुम्हाला स्वतः ला ही कला येणे गरजेचे नाही, तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकता ज्यांना ही कला येते. आणि तुम्ही त्यातूनच आपला नफा मिळवू शकता.
आणि जर तुमच्याकडे ही जर अशी काही कला असेल तर मग काय तुम्हाला कोणालाच पैसे द्यायची गरज नाही आणि स्वतः चा व्यवसाय स्वतः पुढे नेऊ शकता. यातूनच तुम्ही तुमचे आणि गरजू लोकांचे आयुष्य घडवू शकता.
- अन्नप्रक्रिया यूनिट
मित्रांनो, नाव वाचून घाबरू नका. यामध्ये तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता ते अगोदर सांगतो. यामध्ये तुम्ही लोणची बनवणे, केक बनवणे, शेवया बनवणे, मसाले बनवणे असे वेगवेगळे व्यवसाय तुम्ही करू शकता आणि त्यांना पॅक करून ग्राहक यांना विकू शकता.
गावामध्ये राहून केक विकून तुम्ही एका केक मधून तुम्ही जवळपास १०० रूपये कमावू शकता. आणि यात लागत खूप कमी असते आणि सराव झाल्यावर तर फक्त २० मिनिट मध्ये तुम्ही केक बनवू शकता.
तर , मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण ५ असे व्यवसाय कल्पना पहिल्या जे व्यवसाय तुम्ही गावकडेच राहून करू शकता आणि मालक बनू शकता.
तर आजच , या ५ व्यवसायामधून तुम्ही कोणता व्यावसाय करणार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद !