Site icon Udyacha Mharashtra

सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी आणि रवणा येथे विकासाचा नवा अध्याय

satish ghatage patil

satish ghatage patil

सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी आणि रवणा येथे विकासाचा नवा अध्याय.

आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बऱ्याचदा नेते लोकं निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचा तर पाऊसच पाडतात पण शेवट काय होणार हे सर्व जनतेला माहिती असतं. पण सध्या एका नेत्याची चर्चा होत आहे त्याच्या विकसकामामुळे. तुम्ही म्हणाल की विकास तर कोणताही नेता निवडून आला की करतोच की, मग यात असं चर्चेसारखं काय आहे ? तुम्ही काय म्हणाल जेंव्हा एखादा नेता निवडून आला नसताना सुद्धा फक्त आपण दिलेल्या शब्दाला जागावं आणि आपण दिलेला शब्द पाळवा तसेच जनतेचा विकास आणि त्यांचा विकास करावा याच विचाराने या नेत्याने आपले विकास कार्य सुरूच ठेवलेले आहे.

सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी येथे विकासाचा नवा अध्याय

सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी आणि रवणा येथे विकासाचा नवा अध्याय

भार्डी गावातील युवकांनी काही महिन्यांपूर्वी सतीश घाटगे पाटील साहेबांकडे खुल्या व्यायाम शाळेची मागणी केली होती. युवकांच्या उत्साहाला प्रतिसाद देत साहेबांनी व्यायाम शाळा उभारण्याचे वचन दिले होते. आज या वचनाची पूर्तता करत भार्डी गावात व्यायाम शाळेच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज अशी ही व्यायाम शाळा लवकरच साकारली जाणार असून, यामुळे गावातील आरोग्य आणि फिटनेस क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. साहेबांच्या या निर्णयामुळे भार्डीतील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रवणा येथे दर्गाह परिसरातील रस्त्याचे लोकार्पण

रवणा येथे दर्गाह परिसरातील रस्त्याचे लोकार्पण


सतीश घाटगे पाटील यांनी केवळ शब्द नाही तर कृतीतून लोकसेवा कशी केली जाते, याचा आदर्श घालून दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी रवणा येथील दर्गाह शरीफ परिसरातील रस्ता तयार करण्याचे वचन दिले होते. हा रस्ता दर्गाह शरीफला भेट देणाऱ्या भाविकांसाठी तसेच स्थानिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

आज हा रस्ता पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पणही सतीश घाटगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दर्गाह शरीफच्या मजारवर चादर चढवून त्यांनी जनतेसाठी आणखी ऊर्जा मिळावी, अशी प्रार्थना केली.

जनतेला दिलेला शब्द महत्त्वाचा


निवडणुकांमध्ये जय-पराजय हे येत जात असतात, परंतु राजकारणामध्ये जनतेला दिलेला शब्द सर्वांत महत्त्वाचा असतो, हे सतीश घाटगे पाटील यांच्या कामातून पुन्हा सिद्ध झाले. भार्डी आणि रवणा या दोन्ही ठिकाणी केलेल्या विकासकामांमुळे स्थानिक जनतेच्या मनात साहेबांविषयी आदरभाव निर्माण झाला आहे.

सतीश घाटगे पाटील यांनी दाखवलेली ही विकासाची वाट इतर लोकप्रतिनिधींना प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

Exit mobile version