Yojana doot bharti 2024 apply online योजनादूत फॉर्म प्रक्रिया
जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये आवड असेल तर, नवीन संधी (New opportunity ) मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 ( Mukyamantri Yojana Doot Bharti 2024 ) तुमच्यासाठीच आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही सरकारी प्रतिनिधी म्हणून काम करू शकता. महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी योजना दूत भरती Yojana Doot Bharti हा उपक्रम त्यांनी अमलात आणला आहे. आणि याच योजनेमध्ये योजना दूत म्हणून सरकार 50,000 लोकांची भरती करून घेत आहे. याच लोकांच्या मार्फत सरकार आपल्या नवीन योजनांची माहिती नागरिकांच्या पर्यंत पोहोचवणार आहे. ही भरती प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
Yojana doot bharti 2024 apply online
योजना दूतांची कामे:
सरकारी योजना येत असतात, परंतु त्याची पुरेपूर माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आणि याचमुळे जे पात्र आहेत त्यांना सुद्धा योजनेचा फायदा घेता येत नाही. हीच माहितीची उणीव भरून काढण्यासाठी योजना दूत नेमल्या जात आहे. योजना दूत (Yojana Doot Bharti 2024) म्हणून यांना सरकारी योजनांची पुरेपूर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचायची आहे आणि जे पात्र आहेत, त्यांना त्या योजनेचा फायदा घेण्यास मदत करायची आहे. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, योजना दूतांचे महत्त्वाचे काम म्हणजे सरकारी योजनांची अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आहे. तसेच योजना दूत वेगवेगळ्या क्षेत्रातील योजनांच्या बद्दल माहिती नागरिकांना देणार आहेत. यामध्ये विशेषतः कृषी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांचा समावेश आहे. योजना दूत त्यांना माहिती पासून ते त्यासाठी जनजागृती आणि प्रचार तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
ही जरी सरकारी योजना आहे, तरीसुद्धा यामध्ये तुम्हाला मोफत (Free) मध्ये काम करायचं नाहीये. यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये प्रतिमाह मानधन दिल्या जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एक सरकारी प्रतिनिधी म्हणून सहा महिने काम करणार आहात. तसेच सहा महिन्यानंतर तुम्हाला योजना दूत याचे तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. या योजनेत (Yojana Doot Bharti) पात्र होण्यासाठी तुमचं वय 18 ते 35 दरम्यान असलं पाहिजे, तुमचं पदवीच शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे, तसेच कम्प्युटरचा ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजेच कम्प्युटरच्या संदर्भात एखादा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
Innovative Business Ideas
- आधार कार्ड ( Adhar Card )
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- रहिवाशी
- बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
- स्मार्टफोन ( Smart Phone )
अशा पद्धतीने या (Yojana Doot Bharti) योजनेचे फायदे, योजना दुतांची कामे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि तसेच आपण योजना दूत या योजनेचे वैशिष्ट्ये पाहिले आहेत. ही योजना प्रत्येकासाठी ( For everyone ) आहे.
यानंतर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन आत्ताच अर्ज करा (Apply Now).