Weather Alert: २ ते ७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज

पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी शेतकऱ्यांना (Weather Alert: २ ते ७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज) इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस होणार असे सांगितले आहे. राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे.

“राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कळवू इच्छितो की १ डिसेंबरनंतर राज्यात ढगाळ वातावरण (Weather Alert) होण्याची शक्यता आहे. निसर्ग आपल्याला संकेत देत असतो; तुम्ही लक्ष ठेवा, जर वारं सुटलं असेल आणि तीन दिवस सतत वाहत असेल, तर त्यानंतर चार-पाच दिवसांत पाऊस येण्याची चिन्हे असतात.

१ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात (Weather Alert) पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः २ डिसेंबरनंतर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल. तिरुपती बालाजी भागात २८ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

महाराष्ट्रात २ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचे प्रमाण राहील.
या कालावधीत पावसाचा प्रभाव प्रामुख्याने पुढील भागांमध्ये असेल:

या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयक नियोजनामध्ये योग्य तो बदल करावा आणि पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *