विनोद कांबळी Vinod Kambli यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्यामुळे ती आवड त्यांनी जपली होती.

विनोद कांबळी यांचे क्रिकेटमधील यश

भारतामधे खूप कमी लोक सापडतील ज्यांना क्रिकेट आवडत नाही. क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून याच खेळाने अनेकांना सेलिब्रिटी बनवलं आणि एक वेगळी ओळख दिली आहे. आज अश्याच एका महान खेळाडूची आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी Vinod Kambli हे बालपणीचे मित्र आणि एकेकाळी दोघांनी सुद्धा यश्याच्या शिखराला गवसणी घातली होती. पण आयुष्य हे जेवढं यश देते तेवढेच संघर्ष सुद्धा देत असतं. तर चला जाणून घेऊया विनोद कांबळी यांच्या संघर्षाची कहाणी.

विनोद कांबळी Vinod Kambli यांचे बालपण आणि क्रिकेटची सुरुवात

मुंबईमधल्या धारावीतील सर्वसाधारण कुटुंबात जाणलेल्या विनोद कांबळी Vinod Kambli यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्यामुळे ती आवड त्यांनी जपली होती. त्यांनी आपल्या म्हणतीच्या बळावर शारदाश्रम शाळेमध्ये प्रवेश मिळवला आणि तिथेच त्यांची सचिन तेंडुलकर यांच्या सोबत झाली. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी बरेच सामने सोबत खेळले पण सर्वाधिक एक जास्तच गाजला आणि जगाला विनोद कांबळी माहीत झाले. १९८८ साली हॅरिस शील्ड सामन्यात सचिन तेंडुलकर यांच्या सोबत विनोद कांबळी यांनी ६६४ धावांच्या भागीदारीने क्रिकेट विश्वात त्या सामन्याची खूप चर्चा झाली.

विनोद कांबळी Vinod Kambli यांची भारतीय संघात दमदार एंट्री

विनोद कांबळी यांनी १९९३ मध्ये भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केले. त्यांनी सुरुतीच्या कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. काही असे सुद्धा सामने आहेत जे अजूनही लोकांच्या लक्ष्यात आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे २७७ धावा करणारी त्यांची खेळी अजूनही चर्चा रंगवते. त्यांनी आपल्या क्रिकेट च्या कारकिर्दीत दोन द्विशतके आणि चार शतकं केली होती.

शिखरावरून घसरण आणि विनोद कांबळींचा संघर्ष

विनोद कांबळी यांना १९९६ नंतर भारतीय संघात म्हणावा तसा वाव मिळाला नाही. त्यांची यशाच्या शिखरावरून घसरण सुरू झाली होती. झालेल्या दुखापती, शिस्टीचा अभाव आणि इतर काही कारणांमुळे त्यांच्या यश्याला घसरण लागली होती.

विनोद कांबळी Vinod Kambli आयुष्य आणि संघर्ष

क्रिकेट मधून बाहेर झाल्यावर विनोद कांबळी यांनी विविध क्षेत्रात काम केले. राजकारण, चित्रपट, टीव्ही पण म्हणावे तसं यश मिळालं नाही. मराठी BigBoss मध्ये त्यांची हजेरी चर्चेचा विषय बनली.

विनोद कांबळी Vinod Kambliआणि सचिन तेंडुलकर यांची मैत्री

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची मैत्री ही क्रिकेट जगतात सर्वानाच माहिती असलेली ही मैत्री आहे. शालेय क्रिकेट पासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली. पण ती ताणल्यागेल्याचेही चर्चा आहेत.

विनोद कांबळी यांची जीवनकथा यश आणि संघर्ष याने भरलेली आहे. त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी, संकटे यांना मोठ्या धिराने सामोरे जाऊ शकतो. तुम्हाला विनोद कांबळी यांच्या जीवणसंघर्षाबद्दल काय वाटते कमेन्ट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *