श्री नवनाथ कथासार ४० अध्याय

नवनाथ

श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४० श्री नवनाथ कथासार अध्याय १. कथासारनऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज […]