Rishi Panchami 2024 ऋषिपंचमी व्रत: महत्त्व, पूजा विधी आणि सांस्कृतिक महत्त्व – संपूर्ण माहिती
Sarth Tukaram gaatha abhang : सार्थ तुकाराम गाथा अभंग
ऋषिपंचमी (Rishi Panchami 2024 )हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि धार्मिक सण आहे. ऋषिपंचमी ही हिंदू संस्कृती प्रमाणे भाद्रपद शुक्ल पंचमीला साजरी करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात ज्या ऋषींनी भारतीय संस्कृतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यांना आदरांजली म्हणून उपवास करतात, तसेच ऋषींच्या ऋषींचा आशीर्वाद लाभावा यासाठी सुद्धा हा उपवास असतो . या दिवशी ऋषींची पूजा करतात, अर्चना करतात म्हणून या दिवसाला ऋषी पंचमी असे म्हणतात. तर चला मग जाणून घेऊया ऋषीपंचमी विषयी माहिती आणि सविस्तर चर्चा करूया ऋषीपंचमीच्या ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बाबींवर.
ऋषिपंचमी ( Rishi Panchami 2024 ) म्हणजे काय?
ऋषिपंचमी म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्षाची पंचमी तिथी या दिवशी ऋषींची पूजा केली जाते आणि त्यांच्या पिढ्यांच्या आदरार्थ व्रत केले जाते तसेच हे व्रत स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करतात. या व्रतामागे ऋषीमुनींचा आशीर्वाद लाभो आणि प्रपंच सुरळीत चालो हा हेतु सुद्धा असतो. तसेच सुख-समृद्धीही लाभो याचीही आशा असते.
https://youtu.be/0NbUnG8CeQI?si=H8-wxRjB0zULGw79
ऋषिपंचमीचे महत्त्व
हे व्रत करत असताना सात सुपाऱ्यांची पूजा केली जाते आणि त्या सात सुपाऱ्या म्हणजे कश्यप, भारद्वाज, विश्वमित्र, गौतम जमदग्नी ,वशिष्ठ आणि अत्री या सप्तऋषींची प्रत्येकी एक आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधती आहेत. ऋषीपंचमीच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात शुद्धतेसाठी आंघोळीच्या पाण्यात तुळशीचे पाने टाकले जातात अंघोळ करून पूजा करतात वापरतात उपास करतात आणि सगळं काही मंगलमय हो याची कामना करतात.
असेच धार्मिक व्रत आणि कार्य आपल्या भारतीय संस्कृतीला समृद्धी देत आहेत