Manoj Jarange यांना पत्र ; नाहीतर तुमचे नाव लिहून आत्म*त्या करणार
Manoj Jarange यांना पत्र ; नाहीतर तुमचे नाव लिहून आत्म*त्या करणार
सध्या एक पत्र वायरल होत आहे. जे पत्र एका तरुणाने रक्ताने लिहिलेलं आहे, हो रक्ताने लिहिलेलं. आणि हे पत्र त्या तरुणाने मनोज जरांगे पाटील यांना पाठवले आहे. तरुणांने त्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. पण प्रश्न हा पडला आहे की हा तरुण नेमका आहे तरी कोण? पण अजून हे पत्र ज्याने लिहले आहे त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
सध्याचे पत्र वायरल होत आहे, ते एका मराठा समाजातील तरुणाने मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे व्यतित होत हे पत्र लिहिलेले आहे. असे पत्रावरून लक्षात येत आहे. पाटलांची भूमिका महायुतीसाठी पोषक आहे, जर मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले तर भाजपा शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. यापुढे तरुणाने लिहिले आहे की, शिंदे, सामंत, चिवटे यांच्या नादाला लागू नका आणि समाजाची वाट लावू नका, नाहीतर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार. असे पत्रात नमूद केलेले आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा
“शिवश्री मनोज दादा,
तुम्हाला हात जोडून विनंती आहे. चाळीस वर्षांचा लढा संपवू नका. आपले ध्येय मराठा समाजाला आरक्षण मिळवणे आहे, पण मला सध्याची तुमची भूमिका भाजपाला आणि शिवसेनेला मदत करणारी वाटत आहे. तुम्ही मराठा उमेदवार देऊन मराठा मतांचे विभाजन करू नका. तुम्ही समाजासाठी दैवत आहात, तसेच राहा. आपण एकच उमेदवार समाजाचामानाल पण लोकशाहीत बाकीच्यांना पण अधिकार आहेत. तो आपण काढू शकत नाही तुमच्यासाठी खूप तरुणांनी रक्त भिजवलेले आहे त्यातलाच मी एक म्हणून रक्ताने पत्र लिहीत आहे तुम्ही भाजप शिंदे सेनेला मदत करणार असाल आणि मतांचे विभाजन करणारा असाल तर मी आत्महत्या करणार तुमच्या निर्णयामुळे भाजप शिंदे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे विचार करून लिहीत आहे भाजप शिंदेचा छुपा हस्तक होऊन समाजाचा विश्वासघात करू नका शिंदे सामंत चिवटे चा नादाला लागून समाजाची वाट लावू नका नाहीतर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार