मतदारओळखपत्र कसे डाउनलोड करावे : How to download e-Epic card 2024
मतदारओळखपत्र (Voter Id ) हे महत्त्वाच्या दस्तऐवज पैकी एक आहे. मतदार ओळखपत्र हे फक्त दस्तऐवज नसून, मतदान कार्ड हे मतदान कार्ड धारकाची ओळख बनला आहे. या लेखांमध्ये आम्ही आपल्याला मतदान कार्ड कसं (How to download e-Epic card 2024) डाऊनलोड करायचं ते सांगणार आहोत. मतदारओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र क्रमांक किंवा ज्याला Epic No.असं आपण म्हणतो, ते असणे गरजेचे आहे. जर Epic Number तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Reference Number किंवा नोंदणी क्रमांक माहीत असणे गरजेचे आहे. जर ह्या दोन पैकी कोणतेही एक नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
खालील प्रमाणे तुम्ही मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.
- राष्ट्रीय सेवा मतदार पोर्टलला भेट द्या. https://voters.eci.gov.in/
2. डाउनलोड एपिक वर क्लिक करा. मेन पेजवर डाऊनलोड एपिक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3. नवीन खाते तयार करा. अगोदर तुमच्याकडे या वेबसाईटचे खाते नसेल, तर तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल.
Mukhyamantri Mazi Ladaki bahin yojana : या महिलांना मिळणार 4500 रु
4. लॉगिन करा रजिस्टर झाल्यानंतर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला यावरती लॉगिन करायचं आहे पाच मतदारओळखपत्र नंबर किंवा रेफरन्स नंबर एपिक नंबर ज्याला आपण मतदान कार्ड नंबर किंवा जर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल तर त्यापैकी दोन्हीपैकी कोणताही एक नंबर तुम्हाला येथे इंटर करायचा आहे. इथं प्रविष्ट करायचा आहे.
5. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला तिथे व्हेरिफाय करायचा आहे
aadhar card mobile number update in marathi : आधार कार्डसोबत असा जोडा नवीन क्रमांक
6. मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता
यामध्ये दुसरा एक पर्याय आहे, ज्यामधून तुम्ही आपले मतदारओळखपत्र तयार किंवा डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल वरती प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला वोटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. डाऊनलोड झाल्यानंतर त्या ॲप्लिकेशनवर जायचे आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला रजिस्टर करायचे आहे. रजिस्टर झाल्यानंतर लॉगिन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, त्यामध्ये तुम्हाला e-Epic डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा एपिक नंबर किंवा रेफरन्स नंबर असे दोन ऑप्शन येतील तुम्हाला कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे त्यापैकी सिलेक्ट करायचे आहे.जर तुमच्याकडे मतदान कार्ड वोटर आयडी असेल तर तुम्ही फर्स्ट वाला ऑप्शन. पहिले वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल रेफरन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर प्रोसिड करायचं. जर तुम्ही पहिले वाला ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर प्रोसीड झाल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन येतील पहिल्या मध्ये तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचा आहे. हे दोन्ही झाल्यानंतर तुम्हाला प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्या ठिकाणी ओटीपी दिल्यानंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
अशा दोन पद्धतीने मतदारओळखपत्र डाऊनलोड करू शकता, एक वेबसाईटवरून आणि दुसरं मोबाईल एप्लीकेशन वरून अशा दोन पद्धतीने आपण मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो.