भावार्थ ज्ञानेश्वरी
भावार्थ ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी (किंवा भावार्थ दीपिका) हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला भगवद्गीतेवरील एक विस्तृत आणि भावनिक भाष्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ ओवीबद्ध स्वरूपात असून त्यामध्ये सुमारे ९००० ओव्या आणि १८ अध्याय आहेत. या ग्रंथात गीतेतील प्रत्येक श्लोकाचा सहज, सुबोध आणि अध्यात्मिक अर्थ मराठी जनतेसाठी दिला आहे.

संत ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ १६व्या वर्षी लिहिला आणि तो काळ म्हणजे १३व्या शतकातील युग. संस्कृत गीता सामान्य जनतेला समजली जात नव्हती. म्हणून त्यांनी गीतेतील ज्ञान सर्वसामान्य मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली.

या ग्रंथात केवळ गीतेचे भाषांतर नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी त्यात अनेक रूपके, दृष्टांत, अध्यात्मिक गूढ आणि भक्तिरस मिसळून एक अद्वितीय साहित्य तयार केले आहे.

ही विशेष आवृत्ती “भावार्थ ज्ञानेश्वरी (२१ व्या शतकासाठी)” नावाने प्रसिद्ध आहे. लेखक विजय बळवंत पांढरे (B.E. Civil) यांनी ही सुलभ रचना केली आहे, ज्यामुळे नव्या पिढीला ज्ञानेश्वरी समजणे अधिक सोपे झाले आहे.

आज आपण लेखक विजय बळवंत पांढरे यांनी लिहलेल्या ज्ञानेश्वरीचा अध्याय दुसरा पाहत आहोत.

ही ज्ञानेश्वरी ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *