Bail Pola celebrations in Maharashtra

बैलपोळा सण 2024 Bail Pola Festival 2024 :
बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Bail Pola celebrations in Maharashtra)बाकी सणांसारखाच महत्त्वाचा आहे. बैलपोळा सण हा श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. या सणानिमित्त शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. कारण याच बैलांमुळे त्यांना शेतीच्या कामात भरपूर मदत होत असते. शेतकरी सुद्धा बैलांची मेहनत समजून, त्यांचे कष्ट जाणून, त्यांची योग्य ती काळजी घेत असतो. आणि जेव्हा बैलांना गरज असते तेव्हा शेतकरी त्यांना औषध पाणी सुद्धा करत असतो. तसेच शेतकरी त्यांना उत्तम प्रतीचा चारा आणि शुद्ध पाणी देत असतो. शेतकरी हा आपल्या बैलांची काळजी आपल्या स्वतःच्या लेकरासारखी घेतो.
Yojana doot bharti 2024 apply online योजनादूतचा फॉर्म असा भरा !
बैलपोळा तिथी बैल Bail Pola 2024 Date :
यावर्षी बैलपोळा सण हा 2 सप्टेंबरला असणार आहे या दिवशी शेतकरी आपल्या जनावरांना अंघोळ घालून पूजन करत असतात या सणा दिवशी सणाच्या दिवशी बैलांना जास्त महत्त्व दिले जाते आणि त्यांच्या मेहनतीचा कौतुक केले जाते तसेच त्यांची अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांच्या मित्र म्हणून पूजा केली जाते बैलपोळा हा सण दरवर्षी श्रावण अमिसेला साजरा केला जातो.
बैलांची पूजा आणि महत्त्व Bail Pola Celebration :
बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात. तसेच या सणानिमित्त त्यांना दोन-तीन दिवसाची विश्रांती सुद्धा दिली जाते, त्यांना या दिवसात काहीच काम लावले जात नाही. पोळ्याच्या आदल्या रात्री बैलांच्या खांद्यांची पूजा केली जाते. कारण वर्षभर याच खांद्यांवर जू घेऊन ते बैलगाडी, औत म्हणजेच वखर ओढत असतात. दुसऱ्या दिवशी बैलांच्या शिंगांना रंग लावला जातो, त्यांना सजवले जाते, अंगावर झालर, शिंगांना रिबीन, फुगे, पायात घुंगरू, गळ्यात घागर माळ, अश्या अनेक अलंकारांनी त्यांना सजवले जाते. तसेच याच दिवशी गाडीच्या, वखराच्या जुची काव ( रंग ) लावून पूजा केली जाते.
Sarth Tukaram gaatha abhang : सार्थ तुकाराम गाथा अभंग
पोळ्याच्या दिवशी घरातील महिला बैलांची आणि आपल्या घरधन्याची पूजा करतात. बैलांच्या पायावर पाणी टाकले जाते आणि त्यानंतर बैलांना आणि घरधन्याला कुंकू लावल्या जाते. घरात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो, सगळीकडे आनंदी आनंद असतो. त्या दिवशी गावातील सगळे बैल मारुती मंदिराच्या परिसरात एकत्र करतात. त्या ठिकाणी सगळे येऊन मारुतीची आणि बैलांची पूजा करतात, नंतर पूजा झाल्यावर बैल घरी घेऊन जातात आणि घरी पूजा करतात. त्यानंतर सगळेजण सहपरिवार सोबत जेवण करून हा सण साजरा करतात.
why bail pola is celebrated :
बैलपोळा हा फक्त सण नसून शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. कारण याच सणामुळे शेतकऱ्यांना बैलांच्या कष्टाची जाणीव होते आणि त्या प्रकर्षाने शेतकरी त्यांची काळजी घेत असतो आणि दोघेही एकमेकांना साह्य करत असतात. त्यामुळेच या सणाला शेतकऱ्याच्या आयुष्यात एक विशेष स्थान आहे.