देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार: पंकजा मुंडेंना वेगळा न्याय!
पंकजा मुंडें यांना मिळाला न्याय ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज नागपूरच्या राजभवनात विस्तार करण्यात आला. या शपथविधी कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एकूण 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री समाविष्ट आहेत.
पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरून संधी
विशेष बाब म्हणजे फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्यासाठी एक वेगळा न्याय लागू करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या सदस्यत्वावरून मंत्रिपद मिळवणाऱ्या पंकजा मुंडे या मंत्रिमंडळातील एकमेव व्यक्ती आहेत. उर्वरित 38 मंत्री हे विधानसभेतून निवडून आलेले आहेत.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही बहीण-भाऊ एकाच मंत्रिमंडळात सामील होण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रसंग आहे. यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला एक ऐतिहासिक वळण मिळाले आहे.
पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चुलत भावाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा पराभव दिला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या राजकीय घडामोडींनंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळाली.
2014 ते 2019 या कालावधीत फडणवीस सरकारमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, 2019 नंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांची राजकीय वाटचाल काहीशी खडतर ठरली.
मुंडे बहीण-भावांचा ऐतिहासिक योगायोग
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकाच मंत्रिमंडळात असण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच अनुभव आहे. एका कुटुंबातील दोघे जण मंत्रिपदावर विराजमान होणे हे दुर्लभ असले तरी मुंडे कुटुंबाने हा इतिहास घडवला आहे.
फडणवीस 3.0 सरकारने आजच्या शपथविधीमुळे नव्या राजकीय समीकरणांची दिशा दाखवली आहे. आगामी काळात हे मंत्री राज्याच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे योगदान देतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.