ज्ञानेश्वरी ग्रंथ

Sarth Tukaram gaatha abhang : सार्थ तुकाराम गाथा अभंग

 

Gaatha Abhang
Sarth Tukaram gaatha abhang

अभंग : ०१ 

समचरणदृ‌ष्टि विटेवरी साजिरी। तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

sarth tukaram gatha pdf

व्हिडिओ स्वरूपात अभंग पहा 

अर्थ : 

तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगत आहेत, की हे हरी ज्याचे दोन्ही पाय विटेवर समान आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांवर दृष्टीही सम आहे कसलाही भेदभाव नाही अशा तुझ्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर  राहो. आणि त्या व्यतिरिक्त मला कोणताच माइक पदार्थ नको आणि त्या ठिकाणी माझी इच्छा देखील राहू देऊ नये.  देवा ब्रह्म आणि इतर पदे म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिरानीच आहे आणि म्हणून देवा त्या ठिकाणी माझे मन जडू  देऊ नकोस. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात की ,देवा जे काही कर्म धर्म आहेत त्यांचे आम्हाला वर्म कळाले आहे आणि ते म्हणजे सर्व काही नाशवंत आहे.

Rishi Panchami 2024 ऋषिपंचमी व्रत: महत्त्व, पूजा विधी आणि सांस्कृतिक महत्त्व – संपूर्ण माहिती

व्हिडिओ स्वरूपात अभंग पहा 

अभंग : ०२ 

नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें॥੨॥

तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥ ३॥

अर्थ : 

जर एखाद्याला प्रश्न पडला असेल की भक्ति कशी करावी?  तर त्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात मार्गदर्शन केले आहे.  या अभंगात ते म्हणतात की, देवाने तुला जरी गोड आवाज दिला नसेल. गोड गाता येत नसेल, तरीही काही हरकत नाही. विठ्ठल त्यासाठी भुकेलेला नाही, तुला जसं बोलता येईल तसं तू फक्त ‘रामकृष्ण’  हा मंत्र जप आणि देवाकडे तू फक्त भक्ती माग त्या व्यतिरिक्त काहीही नाही.  यापुढे ते म्हणतात की, हे मना तू विठ्ठलावर विश्वास धर आणि तो हळूहळू दृढ  होत जाऊ दे.

Download करा sarth tukaram gatha pdf 

अभंग : ०३ 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

अर्थ : 

संत तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध हा अभंग आहे. वारकऱ्यांच्या भजनाच्या सुरुवातीलाच हा अभंग असतो असं कोणीच नसेल ज्याने हा अभंग कधी ऐकला नसेल. तुकाराम महाराज या अभंगात श्री विठ्ठलाच्या मनमोहक अशा सुंदर रूपाचे वर्णन करत आहेत. असेच सुंदर वर्णन अनेक संतांनी श्रीहरीचे केले आहे. प्रत्येकाला श्रीहरीचे वर्णन करताना आनंदच होतो हा अभंग सुद्धा तसाच आनंद देणार आहे.

या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचे सुंदर रूप विटेवर उभे आहे. त्याचे हात कटेवर म्हणजेच कमरेवर आहेत. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तो पिवळा पितांबर नेसला आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात की हेच रूप मला नेहमी आवडते. माशाच्या आकाराची कुंडले विठ्ठलाच्या कानात शोभत आहेत. तसेच माझ्या विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभ मणी सुद्धा आहे. विठ्ठलाच्या याच सुंदर रूपाकडे पाहत राहणे यातच माझे सुख सामावलेले आहे.

अभंग : ०४ 

सावध झालो सावध झालो | हरिच्या आलो जागरणा ॥१॥

जेथे वैष्णवांचे भार | जयजयकार गर्जतसे ॥२॥

पळोनिया गेली झोप | होते पाप आड ते ॥३॥

 तुका म्हणे तया ठाया | बोल छाया कृपेची ॥४॥

अर्थ :

तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहेत की , सावध झालो सावध झालो. हरिच्या जागरणसाठी आलो. इथे तर काय जथेच्या जथे हरीचे नामस्मरण करत आहे. जयजयकार करत आहेत. माझी झोप तर पळून गेली आहे. जे पाप आड आले होते त्यामुळे जी झोप आली होती. याठिकाणी तर विठ्ठलाची कृपा आणि छाया आहे .

अभंग : ०४ 

                आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया ॥१॥

                 कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥

      गीता भागवत करिती  श्रवण | अखंड चिंतन विठोबाचे ॥३॥

               तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही  ॥४॥

अर्थ :

तुकाराम महाराज या सांगत आहेत की, जो आपल्या हितासाठी जागरूक आहे. ज्याला आपले हित समजते त्याचे आईवडील धन्य  होत. जर कुळामध्ये सात्विक वृत्तीचे कन्या, पुत्र जन्माला आले तर याचा आनंद देवाला सुद्धा होतो. ज्या घरात गीता, भागवत आणि विठोबाचे चिंतन अखंड चालते त्या घरातील लोकांची, भक्तांची सेवा माझ्या हातून होवो. तर मी भाग्यवान ठरेल.

अभंग : ०५ 

अंतरीची घेतो गोडी | पाहे जोडी भावाची ॥१॥

देव सोयरा देव सोयरा | देव सोयरा दिनाचा ॥२॥

आपल्याच वैभवे | शृंगरावे  निर्मळे ॥३॥

तुका म्हणे जेवी सवे | प्रेम द्यावे प्रीतीचे ॥४॥

अर्थ :

देव हा आपल्या मनातील त्याच्या बद्दलची गोडी, भाव बघत असतो. तो दिनाचा सोयरा आहे. आपल्याकडे जेवढे साहित्य आहे त्यानेच देवाला सजवावे. देवाला जास्त कश्याची अपेक्षा नसते शिवाय तुमच्या मनात असलेल्या त्याच्याबद्दलचा भाव. तुकाराम महाराज म्हणतात की देवाला जर प्रीतीचे प्रेम दिले तर तो  आनंदाने तुमच्या सोबत जेवण जेवेल.

 

अभंग : ०६

पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथें तेथें देखे तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥
 तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥

अर्थ :

हे देवा आम्हाला तुझे सर्व काही मिळाले आहे. आता दुसरा कोणताही भाव आमच्या मनात येऊ देऊ नकोस. हे पांडुरंगा जिथे जिथे मी पाहतो तेथे तेथे तुझीच पाऊले मला दिसतात. हे विठ्ठला तु सारे त्रिभुवन व्यापून टाकले आहेस. देवा जगात द्वैत आहे की अद्वैत आहे, ही सगळे मते किंवा वादविवाद भ्रमाचे आहे. त्यांच्याशी वादविवाद करण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नकोस. हे पांडुरंगा एक अनू सुद्धा तुझ्याविणा रिकामा नाही, आणि तुझा व्यापाकपणा पाहिला तर तु आकाशाहूनही मोठा आहेस.

अभंग : ०७

सुखे वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥३॥
नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥४॥
अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥५॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥६॥
गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥

अर्थ :

तुकाराम महाराज एका भोगवादी स्त्रीचे वर्णन या अभंगात करत आहे. आणि तिच्या नादाला लागून तिचा नवरा तिचे सर्व लाड, हट्ट पुरवितो आणि तो शेवटी नरकातच जातो. म्हणून अश्या संसारी माणसाची निंदा तुकाराम महाराजांनी या अभंगात केली आहे. खरतर ती स्त्री सुखिच असते पण अनेक सोंग घेऊन ती नावऱ्याकडून आपला हट्ट पुरवून घेत असते. आपल्या नावऱ्याला म्हणत असते. ” अहो, तुम्ही माझे दुख पहातही नाही आणि समजूनही घेत नाही. ” त्या स्त्री च्या प्रेमात वेडा झालेला तो पती तिची प्रतेक गोष्ट ऐकतो आणि तिच्या हो मध्ये हो भरत असतो. ती त्याला म्हणते, ” अहो मला पोटाची व्यथा आहे, पोटदुखी आहे. ती थांबतच नाही. पथ्याला दूध, तूप, साखर घालून भात खायला लागतो. दुपारी मला पित्ताच्या लहरी येतात, चक्कर येते, कधी कधी मी तर बेसुद्ध सुद्धा पडते. माझ्याकडे जरा लक्ष देत जा. मला झोप येत नाही, माझ्या अंथुरणावर जर फुले घातली तरच मला झोप येते. ही मूलं जवळ किरकिर करतात. त्यांची ती किरकिर मला सहन होत नाही. मला नेहमी कपाळशूळ असतो. अंगाला किंवा कपाळाला चंदन लावते तरीही तो थांबत नाही. मला साधे अन्न चालत नाही. मला तिन्ही वेळेला मिळून, तीन पायलिभर सांजा लागतो. आठवड्यापूर्वी तुम्ही साडे दहा शेर साखर आणली ती सात दिवस सुद्धा पुरली नाही. माझी हाडे कमी झाली आणि माझे मास वाढले आहे. माझे केवढे दुख आहे ! ते तुम्हाला कसे काळत नाही.?” तुकाराम महाराज म्हणतात, की अश्या प्रकारे त्याचा जिवंतपणी गाढव केला आणि तो मेल्यावर नरकात गेला.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *