पुरुषांसाठी ५ योगासने : 5 Yogaposes for Men in Marathi

 5 Yogaposes for Men in Marathi
5 Yogaposes for Men in Marathi

आज-काल टेन्शन ताण-तणाव हे खूप वाढला असून,पुरुषांसाठी (५ योगासने : 5 Yogaposes for Men in Marathi) याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर या दोन्ही स्तरावर होत असतो. याचमुळे व्यक्तीची चिडचिड होणं,रात्री झोप चांगली न येणं,ब्लड प्रेशर हाय असणं,हृदयाचे विकार असणे, मनाला शांती न असणं, जेवण व्यवस्थित न करणे, शरीराला आराम न मिळणे, आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. सांधेदुखी, डोकेदुखी अन अंगदुखी अशा पद्धतीने शरीराला त्रास होत असतो. त्याचबरोबर मनाला सुद्धा यामुळे त्रास होत असतो. मन शांत राहत नाही. चिडचिड जास्त होते तर, ही चिडचिड आणि हा शरीराचा ताण-तणाव कमी करण्यासाठी, मनाला शांती लाभण्यासाठी. वैवाहिक आयुष्यात सुद्धा योगासन करून आपण फायदा मिळवू शकतो. पाच योगासने आज आपण बघणार आहोत. ज्या पाच योगासनांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात जर काही अडचण येत असेल तर, ती दूर करण्यासाठी आज आपण असे पाच आसन पुरुषांसाठी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया.

5 Yogaposes for Men in Marathi

१. भुजंगासन

  1. भुजंग आसन करण्यासाठी तुम्हाला पोटावरती झोपायचं आहे.
  2. त्यानंतर हळूच आपले हात छातीकडे घ्यायचे आहेत.
  3. आणि हळूहळू चेहरा श्वास घेत वरती यायचा आहे.
  4. आणि आपल्या छातीला वरती उचलायचा आहे.
  5. जर शक्य असेल तर वरच्या दिशेला बघायचं आहे. नसेल शक्य तर समोर बघितलं तरी चालेल.
  6. इथे तुम्हाला ५ श्वास थांबायचं आहे. त्यानंतर परत यायचं आहे.

5 Yogaposes for Backpain in Marathi : ही 5 योगासने आहेत पाठदुखीसाठी वरदान

यामध्ये लक्ष ठेवा, जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल तर तुम्ही पायांमध्ये अंतर ठेवू शकता. नसेल तर सोबत पाय ठेवले तरीही चालेल.

यामध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की, यामध्ये आपल्या बेंबीचा भाग हा जमिनीवर असेल किंवा मॅटवर असेल तो उचलायचा नाही.

२. शलभासन

  1. या आसनासाठी सगळ्यात अगोदर चटई वरती पोटावर झोपायचे आहे.
  2. नंतर श्वास घेत हात, पाय, आणि छाती वरती घ्यायची आहे.
  3. या आसनामध्ये तुम्ही ५ श्वास थांबायचं आहे.
  4. परत येऊन आराम करायचा आहे.

जर पाठीचा त्रास असेल तर, पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे.

जर मानेचा त्रास असेल तर, वर न बघता समोर बघायचं आहे.

मतदारओळखपत्र कसे डाउनलोड करावे : How to download e-Epic card 2024

३. बालासन

  1. बालासन साठी अगोदर वज्रासनमध्ये यायचं आहे.
  2. वज्रासन मध्ये आल्यानंतर आपली छाती आणि आपलं पोट आपल्या पायावर येईल आणि आपले हात सरळ होतील अशा हिशोबाने आपल्याला झोपायचं आहे.
  3. या आसनामध्ये तुम्ही ५ श्वास थांबू शकता.
  4. त्यानंतर तुम्ही आराम करू शकता.

जर तुमचे पोट मोठे असेल आणि या आसनामध्ये राहायला त्रास होत असेल किंवा श्वास घेता येत नसेल तर पायांमध्ये अंतर घेऊन हे आसन तुम्ही करू शकता.

४. भद्रासन

  1. यासाठी तुम्हाला अगोदर पाय सरळ ठेऊन बसायचं आहे.
  2. नंतर पाय दुमडून घ्यायचे आहे आणि पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत.
  3. श्वास घायचा आहे.
  4. श्वास सोडत खाली आपल्या पायांकडे यायचं आहे.
  5. तिथे तुम्ही ५ श्वास थांबायचं आहे.
  6. नंतर परत येऊन आराम करायचा आहे.

पाठीमध्ये बाक करायचा नाही. पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

५. वक्रासन

  1. वक्रासन मध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत.
  2. त्यानंतर एक पाय फोल्ड करायचा आहे आणि त्या पायाचा घोटा आपल्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्यापाशी येईल अशा हिशोबाने तो पाय ठेवायचा आहे.
  3. आणि त्यानंतर तुम्हाला जो पाय फोल्ड केला आहे, त्याच्या दिशेला तुम्हाला वळायचं आहे.
  4. आणि उजवा हात पाठीमागे ठेवायचा आहे आणि डावा तुम्हाला तुमच्या उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे.
  5. आता पाठीमागे बघा.
  6. तिथे तुम्हाला ५ श्वास थांबायचं आहे.
  7. यानंतर असंच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे.

तर ही पाच योगासने आहेत, (५ योगासने : 5 Yogaposes for Men in Marathi) ज्यामुळे पुरुषांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये याचा लाभ होऊ शकतो, याचा फायदा होऊ शकतो.

योगासने करून तुम्ही स्वतः आणि परिवाराला सुद्धा निरोगी ठेऊ शकता. योगासनांचा अभ्यास हा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा करू शकता. योगासनांबरोबरच तुम्ही प्राणायाम करून मनाला आनंदी ठेऊ शकता. तर विचार कश्याचा करताय आजपासूनच सुरुवात करा योग अभ्यासाला. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेन्ट करून सुद्धा विचारू शकता. आणि आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच तुम्हाला हव्या असलेल्या विषयाविषयी आम्हाला सांगू शकता. आणि विषयी आम्ही तुम्हाला नक्की माहिती पुरवू.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *